बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात लागू असलेला लॉकडाऊन ७ जून रोजी संपणार आहे. परंतु राज्य सरकार लॉकडाऊन वाढविण्याच्या विचारात आहे. दरम्यान, सीएमओच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक सरकार सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये १४ जूनपर्यंत मुदतवाढ देण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळी याबाबत निर्णय होणे अपेक्षित आहे.
मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आज संध्याकाळी पाच वाजता बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्र्यांनी २ जून रोजी, राज्यात कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आलेला नाही आणि ग्रामीण भागात ही प्रकरणे जास्त आहेत, असे सांगून कठोर उपाययोजना कायम ठेवण्याचे संकेत दिले होते.









