बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात दुसऱ्या दिवशी कोविडची नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी १८०० पेक्षा कोरोना रुग्ण सापडले आहेत. गेल्या २४ तासांत १,८५७ नवीन रुग्ण सापडले तर १,९५० रुग्णांना बरे झाल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर गुरुवारी कोरोनामुळे ३० संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत संक्रमित झालेल्या एकूण रुग्णांची संख्या २९,२४,७३२ इतकी आहे. यापैकी २८,६५,०६७ रुग्णांनी कोरोनाविरुद्ध लढाई जिंकली आहे. तर कोविडमुळे एकूण ३६,९११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, राज्यात रिकव्हरी रेट ९७.९५ टक्क्यांवर पोहोचला आहे. मृत्यूचे प्रमाण गेल्या अनेक दिवसांपासून १.२६ टक्क्यांवर राहिले आहे. राज्यात सध्या २२,७२८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात चाचणी सकारात्मकता दर (टीपीआर) १.१५ टक्के आहे आणि केस मृत्यू दर (सीएफआर) गुरुवारी १.६१ टक्के आहे.
बेंगळूर आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. गुरुवारी बेंगळूर शहरी जिल्ह्यात ३२१ नवीन कोरोना प्रकरणे समोर आली आहेत. यासह, बेंगळूर शहरी जिल्ह्यात एकूण संक्रमित रुग्णांची संख्या १२,३१,७९५ वर पोहोचली आहे. यापैकी १२,०७,३७३ कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. तर सध्या ८,१९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, दक्षिण कन्नड जिल्ह्यात नवीन संक्रमित झालेल्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी बैठक घेत दक्षिण कन्नड जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक उपपयोजना करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. बेंगळूरपेक्षा दक्षिण कन्नड जिल्ह्यात जास्त संक्रमित रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या एका दिवसात जिल्ह्यात ४७५ रुग्णांची नोंद झाली आहे.