बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये कोरोना कर्फ्यू असूनही कोरोनाची संख्या वाढत आहे. तज्ज्ञांनी सांगितले की, येत्या काही दिवसांत कर्फ्यूचा परिणाम दिसून येईल. गेल्या २४ तासात राज्यात कोविडचे ४४,६३१ नवीन रुग्ण आढळले. सलग दुसर्या दिवशी इतक्या मोठ्या संख्येने लोकांना संसर्ग झाला आहे. यासह, संक्रमित लोकांची एकूण संख्या १६,९०,९३४ वर पोहोचली आहे. यापैकी १२,१०,०१३ लोक संसर्गातून बरे झाले आहेत. राज्यात मंगळवारी २४,७१४ रुग्णांनी कोरोनावर मात करत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळविला. राज्यात सध्या ४,६४,३६३ सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यातील आरोग्य विभागाने मंगळवारी कोरोनामुळे २९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह राज्यात आतापर्यंत एकूण मृतांची संख्या १६,५३८ वर पोहचली आहे. राज्यात कोरोना सकारात्मकतेचे प्रमाण २९.०३ टक्के आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.५५ टक्के आणि मृत्यूचे प्रमाण ०.९७ टक्के आहे.









