बेंगळूर/प्रतिनिधी
मार्चपासून प्रथमच कर्नाटकात कोविडच्या सक्रिय प्रकरणांची संख्या २५ हजाराहून कमी आहे. राज्यात पूर्ण लॉकडाऊननंतर राज्यात कोरोनाचा वेग मंदावला. राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या २५ हजाराहून कमी झाली आहे. राज्यासाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे. राज्यात गेल्या २४ तासात १६५३ नवीन संक्रमित रुग्ण सापडले आहेत. तर २५७२ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तर राज्यात गुरुवारी ३१ रुग्णांचा मृत्यू झाला.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या २८,८९,९९४ लाखावर पोहोचली आहे. तर यापैकी २८,२८,८९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आतापर्यंत ३६,२९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३७,९०६ इतकी आहे.
राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे ४१८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. याचवेळी १,१६ तसेच जिल्ह्यात ३ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत १२,२३,६४४ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे.









