बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. राज्यात शुक्रवारी १२४७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. तर ८८७ रुग्णांनी कोरोनावर मत करत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळविला. तसेच राज्यात विविध जिल्ह्यातील कोरोनाने १३ जणांचा बळी घेतला. दरम्यान राज्यात २५,०४६ रुग्ण सध्या उपचारात आहेत. तर आतापर्यंत ११,८३४ जणांचा बळी गेला आहे.
राज्यात कोरोना बाधितांची संख्या लक्षत घेता सर्वाधिक संख्या बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहे. शुक्रवारी जिल्ह्यात ६२० जणांना कोरोनाची लागण झाली. तर २८२ लोक कोरोनावर विजय मिळवत घरी परतले. जिल्ह्यात उपचारात असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यात सध्या १९,२६८ रुग्ण उपचारात आहेत. शुक्रवारी जिल्ह्यात कोरोनाने ८ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात तापर्यंत ४,१७० जण कोरोनामुळे मृत्य पावले आहेत









