बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात शुक्रवारी ३ हजाराहून कमी पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. विशेष म्हणजे शुक्रवारी पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी राहिली. राज्यात काल कोरोनाचे २,९६० नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. शुक्रवारी राज्यातील विविध जिल्ह्यातून २,७०१ रुग्ण कोरोनावर मात करत घरी परतले. राज्यात सध्या ३३,३१९ कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. तर राज्यात शुक्रवारी ३५ कोरोना संक्रमितांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ११,३४७ रुग्णांचा मृत्यू कोरोना संसर्गामुळे झाला आहे.
राज्यात सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहे. सध्या १७,४४१ रुग्ण उपचार घेत आहेत. शुक्रवारी जिल्ह्यात १,५६८ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. तर ८३१ रुग्णांनी कोरोनावर मत केली. दरम्यान १२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आता पर्यंत ३,९३८ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.









