बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक कमी होत चालली आहे. तर राज्यात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. दरम्यान, राज्यात शनिवारी नव्याने संसर्ग झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झाल्यानंतर घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होती. राज्यात २०,६२८ नवीन कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली. तर ४२,४४४ रुग्ण कोरोनावर मात करून रुग्णालयातून घरी परतले. राज्यात २४ तासात ४९२ रुग्णांचा मृत्यू झाला.
राज्यात कोरोनाची एकूण सक्रिय प्रकरणे ३,५०,०६६ इतकी आहेत. दरम्यान, शनिवारी राज्यात सकारात्मकतेचे प्रमाण वाढून १४.९५ टक्क्यांवर गेले. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, शनिवारी बेंगळूर शहरी जिल्ह्यात ४,८८९ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, २१,१२६ रुग्ण बरे झाल्यानंतर घरी परतले. तसेच २७८ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला.









