बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक विद्युत नियामक मंडळाने (केईआरसी) बुधवारी राज्यातील सर्व विद्युत पुरवठा कंपन्यांच्या (ईएससीओएम) वीज दरात प्रति युनिट सरासरी ४०पैशांची वाढ केली आहे. केईआरसीच्या मते, मागणी आणि उर्जा शुल्कामध्ये सरासरी ५.४ टक्क्यांनी वाढ झाल्याने वीज दरात वाढ केली आहे. पहिल्या मीटर रीडिंगपासून वापरल्या जाणाऱ्या विजेसाठी सुधारित दर लागू होईल.