प्रतिनिधी / बेंगरुळ
वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात लागू करण्यात आलेला विकेंड कर्फ्यू पुढेही कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, राज्यात लॉकडाऊन करण्याची कोणतीही योजना नाही, असे उद्योगमंत्री जगदीश शेट्टर यांनी म्हटले आहे. धारवाडमध्ये ते बोलत होते.
सध्या तरी लॉकडाऊन करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. आम्हाला अनावश्यक दुकाने आणि कार्यालये बंद करणे, रात्रीचे कर्फ्यू आणि शनिवार व रविवारचा कर्फ्यू यासारखी कठोर पावले उचलणे भाग पडले. कारण लोकांच्या सहजतेने व निष्काळजी वागण्यामुळे कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली, असे शेट्टर म्हणाले.
आम्ही पुढच्या एका आठवड्यासाठी नाईट कर्फ्यू आणि शनिवार व रविवार कर्फ्यू वाढविण्याच्या विचारात आहोत. परंतु अद्याप याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांनी सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली असून तेथे निर्णय घेण्यात येईल, असे शेट्टर यांनी सांगितले. तसेच यावेळी सहा सदस्यीय तज्ज्ञ समितीच्या आकडेवारीचा विचार केला जाईल, असेही ते म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









