बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि हरियाणा या भाजप शासित राज्यांचा उल्लेख करीत ‘लव्ह जिहाद’ मुळे होणाऱ्या धारमंतराला आळा घालण्यासाठी राज्य सरकार जोरदार उपाय योजना करेल असे ते म्हणाले.
लव्ह जिहादमुळे धर्मांतर याविषयी बर्याच बातम्या आहेत. मला इतर राज्यांविषयी माहिती नाही, परंतु कर्नाटकमध्ये आम्ही हे संपुष्टात आणणार आहोत. पैशांचे आमिष दाखवत किंवा प्रेमाचा वापर करून मुलींचे धर्मांतर होते हे गंभीर आहे, आम्ही या संदर्भात कठोर उपाययोजना करू, असे येडियुरप्पा यांनी गुरुवारी मंगळूर येथे भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत सांगितले.
दरम्यान भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राज्यमंत्री सी. टी. रवि यांनी “लव्ह जिहाद” विरोधात कठोर कायदा करण्याची मागणी केली. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कर्नाटक लग्नासाठी धार्मिक रूपांतरांवर बंदी घालणारा कायदा करेल. जेव्हा जिहादी आमच्या बहिणींशी वाईट वृत्तीने वागतील तर आम्ही गप्प बसणार नाही. धर्मांतराच्या कायद्यात सहभागी असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कठोर व त्वरित शिक्षा भोगावी लागेल, असे त्यांनी मंगळवारी ट्विटच्या माध्यमातून म्हंटले होते.









