बेंगळूर : प्रतिनिधी
“कर्नाटक राज्य सरकार इतर राज्यांनी लागू केलेल्या धर्मांतरविरोधी कायद्यांचा अभ्यास करत आहे आणि लवकरच राज्यात धर्मांतर विरोधी कायदा तयार केला जाईल.” असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना सांगितले
हिंदू जनजागृती समितीचे निमंत्रक मोहना गौडा यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, विविध हिंदू धार्मिक संघटनांच्याच्या 50 पेक्षा जास्त भक्तांनी बोम्माई यांची भेट घेतली आणि धर्मांतरावर बंदी घालणारा कायदा बनवण्याच्या गरजेवर भर दिला. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की राज्यघटना जबरदस्तीने धर्मांतराला परवानगी देत नाही.
श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुथालिक यांनी सांगितले की, शाळा आणि रुग्णालयांचा वापर धर्मांतरासाठी केला जात आहे. राज्यात अनेक बेकायदेशीर चर्चही उदयास येत असल्याचे त्यांनी सांगितले. धर्मांतरितांना अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी विशेष लाभ नाकारण्यात यावा, अशी मागणी प्रतिनिधींनी केली.श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुथालिक, संतोष गुरुजी, सिद्धलिंग स्वामी आणि प्रणवानंद स्वामी हे प्रतिनिधींमध्ये होते.