बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान राज्यात कोरोना बाधितांची संख्या घटत चालली आहे. राज्यात गेल्या २८ दिवसात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९०.७ टक्क्यांहून अधिक झालेला पहायला मिळाला. राज्यात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे.
१ ऑक्टोबर पर्यंत ४,९२,४१२ रुग्ण बरे होऊन घरी परतले होते. तर तीच संख्या २९ ऑक्टोबर पर्यंत ७,४१,२१९ वर पोहचली होती. १ ऑक्टोबरला १,१०४१२ पॉझिटिव्ह रुग्ण होते. ती संख्या आता गुरुवार पर्यंत ६४,४८० वर आली, गुरुवारी ७,६६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
दरम्यान १० ऑक्टोबर रोजी १,२०,९२९ पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णसंख्येत घट झालेली पाहायला मिळाली. २२ ऑक्टोबर रोजी राज्यात १३,५५० विक्रमी रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्या दिवशी सक्रिय रुग्णांची संख्या घटून ९२,९२७ वर आली आणि त्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत घेत होत गेली.









