बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोविड -१९ ने एकूण १४ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तर राज्यात सक्रिय घटनांची संख्याही तीन लाखांच्या पार गेली आहे. मंगळवारी कोरोनाने राज्यात नवा विक्रम केला. राज्यात गेल्या २४ तासात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३१ हजाराच्या वर गेली. मंगळवारी राज्यात ३१,८३० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. तर कोरोनाने १८० जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे एकूण १४,८०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हेल्थ बुलेटिननुसार कर्नाटकात एकूण कोरोना रुग्णांची संख्या १४,००,७७५ इतकी आहे. तर राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ३,०१,८९९ आहे. मंगळवारी राज्यात १०,७९३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत राज्यात एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या १०,८४,०५० इतकी आहे.
राज्यात सर्वाधिक रुग्ण बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहेत. राज्यातील तीन लाख सक्रिय प्रकरणांपैकी २,०६,२२३ एकट्या बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहेत. मंगळवारी शहरामध्ये दिवसभरात१७,५५० जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. तर ९७ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. शहरात आतापर्यंत ६,८७,७५१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कोरोनामुळे ६,००२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.









