बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना रुग्णांची संख्या दररोज कमी जास्त होत आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली. राज्यात लॉकडाऊननंतर सक्रिय रुग्णसंख्येत घट झाली आहे. राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ३५ हजारापेक्षा कमी आहे. राज्यात गेल्या २४ तासात १,९१३ नवीन संक्रमित रुग्णांची नोंद झाली. तर २,४८९ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तर राज्यात मंगळवारी ४८ रुग्णांचा मृत्यू झाला. मंगळवारी राज्यात सकारात्मकतेचे प्रमाण १.५३ टक्के होता. तर मृत्यू दर (सीएफआर) २.५० होता.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या २८,७४,५९७ लाखावर पोहोचली आहे. तर यापैकी २८,०४,३९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आतापर्यंत ३५,९४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३४,२३४ इतकी आहे.
राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे ४०१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर याचवेळी ७०७ रुग्ण कोरोनावर विजय मिळवत रुग्णालयातून घरी परतले.









