बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात मंगळवारी १,१८५ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. यासह राज्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ९,०३,४२५ वर पोहोचली आहे. मंगळवारी १,५९४ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तर ११ जणांचा मृत्यू झाला आहे. यासह राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे ११,९६५ जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. मंगळवारी राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १५,६४५ होती. राज्यात आतापर्यंत ८,७५,७९६ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. दरम्यान ताज्या घटनांपैकी ६७३ प्रकरणे एकट्या बेंगळूर शहरातील आहेत.









