बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात वारंवार कोरोना रुग्णांची संख्या कमी जास्त होताना पहायला मिळत आहे. राज्यात मंगळवारी चोवीस तासात कोरोना संसर्गाची ७,८८६ नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तर ७,८०३ रुग्ण कोरोनावर मत करत रुग्णालयातून घरी परतले. आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार राज्यात कोरोनाचे ९६,९१८ सक्रिय रुग्ण आहेत. मंगळवारी राज्यात ६७,४४३ चाचण्या घेण्यात आल्या. मंगळवारी राज्यात १४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.









