बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. वाढत्या कोरोनाच्या संख्येने प्रशासन चिंतेत आहे. खबरदारी म्हणून प्रशासन योग्य त्या उपाययोजना राबवत आहे. बुधवारी राज्यात प्रथमच कोरोनाचे तीन हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत. यापैकी एकट्या बेंगळूरमध्ये १९७५ पॉझिटिव्ह प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
बुधवारी राज्यात तीन हजाराहून अधिक रुग्ण सापडले असून दुसरीकडे राज्यात एकूण ८७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर त्यापैकी बेंगळूरमध्ये ६० जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, बुधवारी बेंगळूर शहरी जिल्ह्यात १९७५, धारवड जिल्ह्यात १३९, बेल्लारी १३६, म्हैसूर जिल्ह्यात ९९, विजयपुरात ८०, दक्षिणा कन्नड जिल्ह्यात ७६, कलबुर्गी जिल्ह्यात ६७, उडुपीमध्ये ५२ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.
तसेच यादगिरी जिल्ह्यात ४९, उत्तरा कन्नड जिल्ह्यात ४८, बेळगावातील ४१, गदगमध्ये३९, बिदरमध्ये ३५, दावणगिरी जिल्ह्यात ३५, बागलकोट ३४ चिकलब्लापूर जिल्ह्यात ३२, मंड्यामध्ये ३१, शिवमोगा २९, रायचूर येथे २६ तर हसन जिल्ह्यात २५ नवीन कोरोना संक्रमित रूग्ण सापडले आहेत.









