ऑनलाईन टीम/तरुण भारत
केंद्र सरकारने उत्पादन शुल्क कमी केल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमतीही कमी झाल्या आहेत. भाजप शासित राज्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करून सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्र व राज्य सरकारने पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्यामुळे कर्नाटकात पेट्रोल व डिझेलच्या दरात मोठी घट झाली. केंद्राचा नवा दर गुरुवारपासून तर राज्याचा नवा दर शुक्रवारपासून लागु झाला. दरम्यान बेळगावात पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी झालेल्या पाहायला मिळाल्या. बेळगावमध्ये शनिवारी (ता. ६) पेट्रोल दर १००.३५ पैसे तर डिझेलचा दर ८४.८३ पैसे होता. पेट्रोल १३.३२ तर डिझेल १९.४७ पैसे कमी झाले माहे. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन केंद्राने पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केलं आहे. तर ज्या राज्यांमध्ये भाषची सत्ता आहे. त्या राज्यांनीही पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले आहेत. यामुळे नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.
दरम्यान. देशात एकीकडे पेट्रोल-डिझेलचे दर दररोज वाढताना केंद्र सरकारने बुधवारी (ता. ३) पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात ५ रुपये, तर डिझेलवरील उत्पादन शुल्कात १० रुपये केले. त्यानंतर राज्य सरकारने देखील गुरुवारी (ता. ४) पेट्रोल व डिझेलच्या दरात प्रतिलिटर ७ रुपये कमी केले. बुधवारी (ता. ३) बेळगाव शहरातील पेट्रोलचा दर ११३.६७ पैसे होता. तर डिझेल १०४.३० रुपये होता. केंद्र व राज्याचा दर लागु झाल्यानंतर यामध्ये मोठा बदल झालेला आहे.
बेळगावात यापूर्वी जुन महिन्यात पेट्रोल दर १०० च्या घरात होता. त्यानंतर गेल्या चार महिन्यात हा दर ११३ पर्यंत पोहचला होता. तसेच मार्च महिन्यात डिझेल ८५ रुपये होते. त्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात १०४ पर्यंत गेले होते. आता यामध्ये मोठी कपात झाल्यामुळे हे दर कमी झाले आहेत. बेळगावला महाराष्ट्र राज्याची सीमा लागु आहे.