बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये बुधवारी पुन्हा एकदा कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या एक लाखांच्या पुढे गेली. गेल्या चोवीस तासात राज्यात कोरोना संसर्गाची ९,७२५ नवीन प्रकरणे समोर आली आहेत. त्याच वेळी रुग्णालयातून ६,५८३ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर बेंगळूरमध्ये कोरोनाची ३,५७१ नवीन प्रकरणे समोर आली आहेत. आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार राज्यात कोरोनाचे १,०१,६२५ सक्रिय रुग्ण आहेत. बुधवारी राज्यात ७०,९८१ चाचण्या घेण्यात आल्या.
राज्यात संसर्ग झालेल्या एकूण एकूण रुग्णांची संख्या ४,८४,९९० वर पोहोचली आहे. यापैकी १,०१,६२६ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर राज्यात एकूण ३,७५,८०९ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळवला आहे.









