बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात शनिवारी नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत घट झाली आहे. कोरोना प्रकरणांमध्ये परिस्थिती जैसे थे आहे. गेल्या २४ तासांमध्ये कोरोना संसर्गाची १,६४० नवीन प्रकरणे समोर आली आहेत. यापैकी बेंगळूर शहरी जिल्हा आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दोन्ही जिल्ह्यात मिळून ६९९ प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
दरम्यान, बेंगळूर शहरी जिल्ह्यात ३५७ नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली. तर दक्षिण कन्नड जिल्ह्यात, शनिवारी ३४२ जणांना कोरोनाची लागण झली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात शनिवारी १,६४०रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. याचवेळी कोरोनामुळे ३२ जणांचा बळी गेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कोरोना सक्रिय प्रकरणे २४ हजारांवर आहेत. शनिवारपर्यंत राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या २४,२६६ होती.









