बेंगळूर/प्रतिनिधी
देशात तिसऱ्या टप्प्यात कोरोना लसीकरण सुरु आहे. लसीकरणाचा आजचा दुसरा दिवस आहे. दरम्यान कर्नाटकात दुसऱ्या दिवशी ६३१३ ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. कोरोना लसीकरण मोहिमेच्या दुसर्या टप्प्यात वयोवृद्ध नागरिक आणि ४५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील लोकांसाठी लसीकरण सुरु आहे. मोहिमेच्या दुसर्या दिवशी मंगळवारी राज्यभरात ६,३१३ जणांना लसीचा पहिला डोस मिळाला, अशी माहिती सुनिता राव. आर आणि किरण पाराशर यांनी दिली.
आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या म्हणण्यानुसार त्यापैकी १,१४७ लोक ४५-६० वयोगटातील वर्गवारीत होते. मंगळवारी आरोग्य आणि अग्रभागी कामगारांसह १०,०४६ जणांना लसीकरण करण्यात आले. १६ जानेवारीपासून राज्यात ८.३ लाख लसीकरण करण्यात आले आहे.









