बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. सोमवारी राज्यात ७७२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. राज्यात सध्या १४,००१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान सोमवारी राज्यातील विविध जिल्ह्यात १,२६१ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तर ७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण १२,०१६ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
राज्यात सर्वाधिक रुग्ण हे बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहेत. सोमवारी जिल्ह्यात ३६३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. बेंगळूरमध्ये सक्रिय प्रकरणांची संख्या ९,२५६ आहे. जिल्ह्यात सोमवारी ७०९ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. तर जिह्यात ५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ४,२७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.









