मध्य रेल्वे प्रशासनाचा निर्णय, चाचणी अहवाल 72 तासांपूर्वीचाच हवा
प्रतिनिधी/मिरज
कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाने काही निर्बंध आणखीन कडक केले आहेत. केवळ आरक्षित गाड्यातून प्रवास करण्यासह महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना आरटीपीसीआर कोरोना निगेटीव्ह प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल 72 तासांपूर्वीचाच असावा, असेही बंधन घातले आहे.
कोरोना संसर्गज्यन्य आजार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. रेल्वे प्रवासादरम्यान कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने यापूर्वीच कडक निर्बंध लागू केले आहेत. सोशल डिस्टन्स पाळणे आणि मास्क-सॅनिटायझरचा निमित वापर करणे बंधनकारक केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही करण्यात येत आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटकात प्रवास करण्यासाठी केवळ लांब पल्ल्यांच्या एक्सप्रेस गाड्या सुरू आहेत. या गाड्यातून केवळ तिकिट आरक्षित केलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची मुभा आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने 31 जुलै पासून नवे निर्बंध लागू केले असून, महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशाकडे आरटीपीसीआर चाचणी केलेले कोरोना निगेटीव्ह प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. प्रवासादरम्यान 72 तासांपूर्वीचेच प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. कोरोना निगेटीव्ह प्रमाणपत्र नसल्यास प्रवाशांना प्रवास करता येणार नाही, असेही मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








