बेंगळूर/प्रतिनिधी
गुरुवारी कर्नाटकात पुन्हा कोरोनाच्या नवीन प्रकरणांची संख्या नऊ हजारांच्या पुढे गेली. गेल्या चोवीस तासात राज्यात कोरोना संसर्गाची ९,३६६ नवीन प्रकरणे समोर आली आहेत. त्याच वेळी राज्यात कोरोनातून बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णची संख्या ७,२६८ होती. तर राजधानी बेंगळूरमध्ये कोरोनाची ३,७९९ नवीन प्रकरणे समोर आली आहेत. तर ९३ कोरोना संक्रमित रुग्ण मरण पावले आहेत. आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार राज्यात कोरोनाचे १,०३,६३१ सक्रिय रुग्ण आहेत. गुरुवारी राज्यात ७२,०३० चाचण्या करण्यात आल्या.









