बेंगळूर प्रतिनिधी
कर्नाटकात गुरुवारी ६,७०६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यात कोरोना बाधितांची संख्या २ लाख पार गेली आहे. तर ८६,०९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या एकूण २,०३,२०० झाली आहे. त्यापैकी १,२१,२४२ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळेही आतपर्यंत ३,६१३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील १०३ रुग्णांचा गुरुवारी मृत्यू झाला आहे. राज्यात ७८,३३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील आयसीयूमध्ये ७२७ रुग्ण दाखल आहेत.
गुरुवारी आढळलेल्या ६,७०६ नवीन रुग्णांपैकी १,८९३ रुग्ण बेंगळूर शहरातील आहेत. परंतु त्याहूनही अधिक म्हणजेच गुरुवारी रुग्णालयातून २,२१२रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण ८१,७३३ रुग्णांपैकी३३,१४८ रुग्णांवर उपचार सुरू असून ४७,२४६ रुग्ण बरे झाले आहेत. तर १३३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील 22 जणांचा मृत्यू गुरुवारी झाला आहे.









