बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात गुरुवारी ४,०२५ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. गुरुवारीही घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होती. राज्यात गुरुवारी ७,६६१ रुग्ण कोरोनमुक्त होऊन घरी परतले. दरम्यान गुरुवारी बेंगळूरमध्ये २,१७५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. तर राज्यात गुरुवारी एकूण ४५ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी १९ जण बेंगळूर मधील आहेत. राज्यात आतापर्यंत ११,०९१ रुग्णांचा मृत्यू कोरोना संसर्गामुळे झाला आहे.
गुरुवारी राज्यात कोरोनाची एकूण सक्रिय प्रकरणे वाढून ती ६४,४८० वर पोहोचली. यापैकी ४,१५३८ रुग्ण हे बेंगळूर मधील आहेत. बेंगळूर शहरी जिल्ह्यात गुरुवारी ४,३७८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत ३,८२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.









