बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना गुरुवारी कोरोना रुग्णांची एकूण संख्या दहा लाखांवर गेली. गुरुवारी राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या १०,०१,२३८ वर गेली आहे. गुरुवारी राज्यात ४,२३४ नवीन रुग्णांना कोरोना संसर्ग झाला आहे.
राज्यात बंगळूरमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक लोकांना कोरोना संसर्ग झाला असून गुरुवारपर्यंत संसर्ग झालेल्या लोकांची एकूण संख्या ४,३७,७३३ होती.
दरम्यान एकटीनं रुग्णांपैकी ९,५७,७६९ लोक यशस्वी उपचारानंतर घरी परतले आहेत. गुरुवारी चोवीस तासात १८ जणांचा बळी गेला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण१२,५८५ लोक मरण पावले आहेत. गुरुवारी राज्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ३०,८६५ होती.









