बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी होत असताना गेल्या दोन दिवसात कर्नाटकात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. गेल्या २४ तासात राज्यात १८,३२४ नवीन संक्रमित रुग्णांची भर पडली आहे. यापूर्वी बुधवारी राज्यात १६,३८७ आणि मंगळवारी १४,३०८ रुग्ण आढळले होते. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत राज्यात मृतांची संख्याही वाढली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी ४६४, बुधवारी ४६३ आणि गुरुवारी ५४१रुग्णांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच, या महिन्याच्या पहिल्या तीन दिवसांमध्ये कोविडमुळे १,४४१ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह एकूण मृत्यांची संख्या ३०,५३१ वर पोहोचली आहे.
दरम्यान,राज्यात आतापर्यंत एकूण कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या २६,५३,४४६ वर पोहोचली आहे. तर यापैकी २३,३६,०९६रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
गुरुवारी २४,०३६ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार देण्यात आला. तर राज्यात सध्या २,८६,७९८ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात सकारात्मकतेचे प्रमाण १२.२० टक्के आहे आणि प्रकरणातील मृत्यूचे प्रमाण २.८० टक्के आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.०४ टक्क्यांवर पोहोचले आहे, तर मृत्यूचे प्रमाण १.१५ टक्के आहे.