बेंगळूर/प्रतिनिधी
देशात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेकांचा जीव गेला. अनेक मुले अनाथ झाली. दरम्यान, कर्नाटकातही एका प्राथमिक सरकारी सर्वेक्षणात ४२ मुलांचे आई-वडील कोरोनामुळे दगावल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, एका प्राथमिक सरकारी सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की कर्नाटकातील ८११ मुलांनी कोरोनामुळे आपला एक पालक गमावला आहे. गतवर्षी मार्चपासून या पालकांचा कोरोनामुळे जीव गेला आहे. तसेच ४२ मुलांनी आपले दोन्ही पालक गमावले आहेत. दोन्ही पालक गमावल्याने मुलांच्या डोक्यावरील मायेचे छत्र हरवले आहे.यामध्ये पाच मुले सात वर्षाखालील व उर्वरित १० ते १८ वर्षे वयोगटातील आहेत.