बेंगळूर /प्रतिनिधी
राज्यात कोरोना बाधितांसह मृतांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी राज्यात ६६७० नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली. यासह, राज्यात एकूण संक्रमित रुग्णांची संख्या १,६४,९२४ वर पोचली आहे. यापैकी ७७,६८६ रुग्णांवर उपचार सुरू असून ८४,२३२ रुग्ण आता पर्यंत बरे झाले आहेत.
शुक्रवारी रुग्णालयातून ३,९५१ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आरोग्य विभागाने दिलंरल्या माहितीनुसार राज्यात शुक्रवारी आणखी १०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत २,९९८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. बेंगळूरमधील ३२६ रुग्णांसह राज्यात आयसीयूमध्ये ६७८ रुग्ण दाखल आहेत.
राज्यात २४ तासात २३६६४ जलद प्रतिजैविक आणि १९,८८९ आरटी-पीसीआरची चाचणी घेण्यात आली. आतापर्यंत १६,२४,६२८ लोकांची तपासणी केली आहे.
बेंगळूर शहरात शहरात २,१४७ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे संक्रमित लोकांची एकूण संख्या ६९,५७२ वर पोहोचली आहे. यापैकी ३३,३०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ३५,०६३ रुग्ण बरे झाले आहेत. त्यापैकी शुक्रवारी१,१३१ रूग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. परंतु आतापर्यंत १२०० रूग्णांना वाचविता आले नाही.









