बेंगळूर/प्रतिनिधी
गुरुवारी राज्यात कोरोनाची ४०६ नवीन प्रकरणे नोंदविली गेली तर ३०६ रुग्णांना कोरोनमुक्त झाल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला . दरम्यान राज्यात संक्रमित रुग्णांची एकूण संख्या ९,४६,८६० वर पोहोचली आहे. तथापि, यापैकी ९,२८,७६७ लोक बरे झाले आहेत.
राज्यात आता,५७९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी १२५ रुग्ण आयसीयूमध्ये दाखल आहेत. कोविडने राज्यात १२,२८२ रूग्णांचा बळी घेतला आहे. यातील सहा मृत्यूची गुरुवारी पुष्टी झाली. गेल्या काही दिवसांत मृतांच्या संख्येत वाढ झाल्याने, मृत्यूची संख्या १.४७ टक्के वर गेली आहे. सकारात्मकतेचा दर ०.६८ टक्के आहे.
बेंगळूर शहरी जिल्ह्यात गुरुवारी २५६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यासह जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४,०३,०२७ वर पोहोचली आहे. तर ३,९४,४७२ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. आतापर्यंत शहरातील ४,४४१ रूग्णांनी आपला जीव गमावला. तर जिल्ह्यात सध्या ४,११३ सक्रिय प्रकरणे आहेत.
आरोग्य विभागाने राज्यात गेल्या २४ तासात एकूण ५९,६३५ नमुन्यांची तपासणी केली. ज्यात ४,००९ जलद प्रतिजैविक आणि ५५,६३५ आरटी-पीसीआर चाचण्यांचा समावेश आहे.









