बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात दिवसेंदिवस कोरोनाचा वेग कमी होत आहे. शनिवारी राज्यात १,२०३ नवीन कोरोना संक्रमित रुग्णांची भर पडली आहे. तर १,५३१ रुग्ण कोरोनावर मात करत घरी परतले. तर शनिवारी राज्यात ११ कोरोना संक्रमितांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत कोरोना संसर्गामुळे ११,९३९ रुग्णांचा झाला आहे. राज्यात सध्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १८,२५४ वर पोहोचली आहे.
दरम्यान बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या सर्वाधिक आहे. जिल्ह्यात शनिवारी ६०६ नवीन कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली. तर ९२३ रुग्ण कोरोनमुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. सध्या बेंगळूरमध्ये सक्रिय प्रकरणांची संख्याही १२,९०२ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात शनिवारी सहा जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोना संसर्गामुळे ४,२३० रुग्णांचा मृत्यू झाला