बेंगळूर /प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोनाने नवा विक्रम नोंदविला आहे. आतापर्यंत कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये राज्यात पहिल्यांदाच एका दिवसात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गुरुवारी, ९,३८६ नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह राज्यात संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 3,09,792 वर पोहोचली आहे. यापैकी,८४,९८७ रुग्ण उपचार घेत असून २,१९,५५४ रुग्णांनी कोरोना विरुद्ध लढाई जिंकली आहे. त्यापैकी ७,८६६ रूग्णांना गुरुवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात गुरुवारी आणखी १४१ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे म्हंटले आहे. कोरोनामुळे आतापर्यंत ५,२३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ७४७ रुग्ण आयसीयूमध्ये दाखल आहेत.









