बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना दररोज स्वत: चा विक्रम मोडत आहे. राज्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा वेग थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या २४ तासात राज्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १४ हजाराच्यावर गेली. राज्यात गुरुवारी कोविडची १४,७३८ नवीन प्रकरणे नोंदली गेली. कोरोनाची दुसरी लाट सुरु झाल्यापासून एका दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झालेली आहे. दरम्यान राज्यात गुरुवारी १४,७३८ कोरोना बाधितांची भर पडली. तर गुरुवारी कोरोनामुळे ६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ११.०९ लाखांवर गेली आहे. तर राज्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या एकूण रुग्णांची संख्या १३,११२ वर पोहोचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने गुरुवारी दिली. यापूर्वी बुधवारी राज्यात एक दिवसातील सर्वात मोठी ११,२६५ प्रकरणे नोंदली गेली. गुरुवारी राज्यात दिवसभरात ३,५९१ रूग्णांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी परतले आहेत. रे राज्यात सध्या ९६,००६ रुग्ण उपचारात आहेत.
१५ एप्रिल रोजी संध्याकाळपर्यंत राज्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ११.,०९६५० वर पोहोचली आहे. तर ९,९९,९५८ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले आहेत. दरम्यान बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोनाची संख्या वाढतच आहे. गुरुवारी जिल्ह्यात १०,४९७ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे.









