बेंगळूर/ प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी वाढत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात प्रशासनाची चिंता वाढत आहे. तसेच दिलासादायक बाब म्हणजे रुग्णांचा बरा होण्याचा वेगही वाढला आहे. राज्य आरोग्य विभागाने जरी केलेल्या बुलेटिन नुसार राज्यात बुधवारी १०,९४७ नवीनरुग्णांची भर पडली आहे. यासह, राज्यात एकूण कोरोना संक्रमित संख्या ६,६८,६५२ वर पोहोचली आहे. यापैकी ५,४२,९०६ रूग्ण कोरोनावर विजय मिळवत रुग्णालयातून घरी परतलेत. दरम्यान राज्यात सध्या १,१६,१५३ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आयसीयूमध्ये ८४१ रुग्ण दाखल आहेत. कोरोनामुळे एकूण ९,५७४ रूग्णांनी आपला जीव गमावला आहे. तर अतिरिक्त १९ रुग्णांचा मृत्यू कोरोना व्यतिरिक्त आजारामुळे झाला आहे. तर बुधवारी ११३ रुग्णांच्या मृत्यूची पुष्टी झाली.
बुधवारी एका दिवसात १,०४,३४८ जणांची चाचणी घेण्यात आली. बुधवारपर्यंत राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१. ९ टक्के होते आणि मृत्यूचे प्रमाण १.४३ टक्के होते.









