बेंगळूर/प्रतिनिधी
मंगळवारी कर्नाटकात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने पुन्हा धोका निर्माण झाला आहे. गेल्या चोवीस तासात राज्यात कोरोना संसर्गाची ९,०५८ नवीन प्रकरणे नोंदली गेली. राज्यात मंगळवारी ५,१५९ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळवत रुग्णालयातून घरी परतले आहेत. आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार राज्यात कोरोनाचे ९०,९९९ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात मंगळवारी १३५ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला झाला आहे.
बेंगळूर शहरी जिल्ह्यात मंगळवारी २,९६७ रुग्णांची भर पडली. त्यामुळे एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३८,९०६ वर गेली आहे. जिल्ह्यात मंगळवारी १,१३७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत २,००५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.









