बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना रुग्णसंख्येच्या वाढीचे प्रमाण कमी जास्त होत आहे. शुक्रवारी राज्यात ९,४६४ नवीन कोरोना रुग्णांची संख्या नोंदवली गेली. तर दिलासादायक बाब म्हणजे राज्यात १२,५४५ लोकांनी कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले.
पहिल्यांदाच एका दिवसात इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे झाले आहेत. यासह राज्यात सक्रिय रूग्णांची संख्या एक लाखांवरून ९८,३२६ वर आली आहे. आतापर्यंत एकूण ४,४०,४११ लोकांना कोरोना संसर्ग झाला आहे. यापैकी ३,३४,९९ लोकांनी कोरोनाविरुद्ध लढाई जिंकली आहे. राज्य आरोग्य विभागाने शुक्रवारी १३० रूग्णांच्या मृत्यूची पुष्टी केली. यासह मृतांची संख्या ७ हजारांवरून ७,०६७ वर गेली आहे. आयसीयूमध्ये ७७० लोकांवर उपचार सुरू आहेत. राज्यात मृत्यूचे प्रमाण १.६० आणि रुग्ण बरे होण्याचा दर ७६.०६ होता.
गुरुवारी सायंकाळपासून ते सायंकाळ पाच पर्यंत २८,३५० जलद प्रतिजैविक आणि ३६,३१९ आरटी-पीसीआर तपासणीसह एकूण ६४,६६९ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण ३६,५०,८१९ लोकांची तपासणी केली गेली आहे.









