बेंगळूर/प्रतिनिधी
देशाचे कोरोना रुगणांची संख्या वाढतअसताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयने कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, मार्चमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना किमान ७० टक्के आरटी-पीसीआर चाचणी घेण्याचे निर्देश दिले होते. आरटी-पीसीआर चाचणीत सुरूवातीपासूनच कर्नाटक आघाडीवर आहे, गेल्या एका आठवड्यापासून सुमारे राज्यात ९२ टक्के आरटी-पीसीआरची चाचणी घेण्यात येत आहे. साथीच्या रोगापासून राज्यात १३ मे पर्यंत आरटी-पीसीआर चाचण्यांचे प्रमाण ८३ टक्के राहिले आहे. कर्नाटकात आरटी-पीसीआर चाचण्यांची संख्या सर्वाधिक आहे.
आरोग्य व वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के. सुधाकर म्हणाले की, आरटी-पीसीआर चाचणी रॅपिड अँटीजेन चाचणीपेक्षा अधिक प्रभावी आणि विश्वासार्ह आहे. अधिकाधिक आरटी-पीसीआर तपासणी कोरोना साथीच्या आजारावर सामोरे जाण्यास मदत करीत आहेत.
ते म्हणाले की कर्नाटकात एकूण ५,९३,०७८ सक्रिय प्रकरणे आहेत. यापैकी ३,५९,५६५ म्हणजेच ६० टक्के प्रकरणे एकट्या बेंगळूर शहरातील आहेत. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जास्तीत जास्त आरटी-पीसीआर चाचण्यांची संख्या.
कोरोनाच्या दुसर्या लाटेच्या सुरूवातीस केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ७० टक्के आरटी-पीसीआर चाचणी करण्याचे निर्देश दिले होते. कर्नाटकात आतापर्यंत २,७५,२१,०२८ नागरिकांची चाचणी केली आहे. यापैकी २,२८,४९,५०६ चाचण्या आरटी-पीसीआर आहेत.