बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना सक्रिय रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने प्रशासनाला दिलासा मिळत आहे. राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या २३ हजारावर पोहोचली आहे. राज्यात गेल्या २४ तासात १,६०६ नवीन संक्रमित रुग्णांची भर पडली आहे. तर १,९३७ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तर राज्यात सोमवारी ३१ रुग्णांचा मृत्यू झाला.
सोमवारी राज्यात सकारात्मकतेचे प्रमाण १.४ टक्के होते. तर मृत्यू दर १.९३ टक्के होता. दरम्यन, राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे ४६७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या २८,९६,१६३ लाखावर पोहोचली आहे. तर यापैकी २७,३६,६७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आतापर्यंत ३६,४०५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या २३,०५७ इतकी आहे.