बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी झाली असली तर धोका अद्याप टळलेला नाही. राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 24 हजारापेक्षा कमी आहे. राज्यात गेल्या २४ तासात १,८५७ नवीन संक्रमित रुग्णांची भर पडली आहे. याचवेळी २,०५० रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तर राज्यात शनिवारी २९ रुग्णांचा मृत्यू झाला.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या २८,९३,५५६ लाखावर पोहोचली आहे. तर यापैकी २८,३३,२७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आतापर्यंत ३६,३५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या २३,९०५ इतकी आहे.
राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे ५५१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. याचवेळी ५६० रुग्ण कोरोनावर विजय मिळवून रुग्णालयातून घरी परतले. तसेच जिल्ह्यात ९ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाल.









