बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढत असताना राज्यांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत होती. याची दखल घेत केंद्राकडून राज्यांना ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. दरम्यान, कर्नाटकात आणखी एक ऑक्सिजन एक्सप्रेस गुरुवारी रात्री बेंगळूर येथे व्हाइटफील्डला पोहोचली. ही ऑक्सिजन एक्सप्रेस १२० मे.टन ऑक्सिजन बेंगळूरमध्ये दाखल झाली. या ट्रेनमध्ये प्रत्येकी २० टन एलएमओसह सहा क्रायोजेनिक कंटेनर होते.
नैऋत्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ही ट्रेन ताटानगरहून २६ रोजी निघाली आणि २७ तारखेला रात्री बेंगळूरला पोहोचली. ही ट्रेन एकूण १८८६ कि.मी.चा प्रवास करत बेंगळूरला पोहोचली.