कोल्हापूर/प्रतिनिधी
देशात ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटचा धोका ओळखून खबरदारी घेण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांची आता तपासणी होणार आहे. यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तपासणी नाके आजपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पत्रकार परिषदेत दिली. कर्नाटकातून कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेले प्रमाणपत्र किंवा आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह असणे बंधनकारक असणार आहे.









