बेंगळूर/प्रतिनिधी
शनिवारी कर्नाटकातून पहिली किसान रेलगाडी सुरू झाली. विशेष ट्रेन (क्र.००६२५) केएसआर बेंगळूर रेल्वे स्थानकातून नवी दिल्लीतील हजरत निजामुद्दीन स्थानकाकडे रवाना झाली.
या गाडीतून ३० टन भाज्या व इतर कृषी उत्पादने घेऊन बेंगळूरहून दिल्लीला रवाना झाली. त्यात म्हैसूर, हसन, आर्सीकेरे, दावणगिरी, हुबळी, लोंडा, बेळगाव आणि इतर राज्यात थांबे असणार आहेत. ज्या ठिकणी सामानाची चढ, उतार केली जाईल त्याच ठिकाणी थांबणार आहे.
बेंगळूरहून सकाळी सुटलेली ही गाडी सोमवारी रात्री ११.४५ वाजता हजरत निजामुद्दीनला पोहोचेल. परतीच्या दिशेने ही गाडी (क्र.००६२५) मंगळवारी सकाळी ११ वाजता दिल्लीहून सुटेल आणि गुरुवारी संध्याकाळी ७.४५ वाजता केएसआर बेंगळूरला पोहचणार आहे.









