बेंगळूर/प्रतिनिधी
माजी मंत्री आणि विजापूर शहर आमदार बसणगौडा आर. पाटील यत्नाळ यांनी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वात सरकारविरोधात टीकास्त्र सोडले आहे. या टीकेबद्दल कर्नाटकमधील अनेक आमदारांनी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. दरम्यान यत्नाळ यांनी राज्यातील मुख्यमंत्री बदलण्याची मागणी केली आहे.
दरम्यान केंद्रातील आमच्या नेत्यांना यत्नाळ यांच्या अनादरपूर्ण टिप्पणीबद्दल आम्हाला काय वाटते याची जाणीव असणे आवश्यक आहे. अशा टिप्पण्यांमुळे नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. तसेच सरकारविरोधात बोलण्याचा परिणाम आगामी पोटनिवडणुकीवर होईल, त्यामुळे आम्ही यत्नाळ यांच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवित असल्याचे भाजपच्या एका ज्येष्ठ आमदाराने नाव न छापण्याच्या अटीवर माध्यमांना सांगितले.









