प्रतिनिधी/ बेंगळूर
दहावी परीक्षांची तारीख जाहीर करण्यात आली असून येत्या 14 जून पासून परीक्षेला प्रारंभ होणार असून 25 जून पर्यंत परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती कर्नाटक राज्याचे शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी दिली आहे.
14 जून रोजी प्रथम भाषा, 16 जून रोजी गणित, 18 जून रोजी द्वितीय भाषा, 21 जून रोजी विज्ञान, 23 जून रोजी तृतीय भाषा आणि 25 जून रोजी समाज – विज्ञान या विषयांचे पेपर होणार आहेत.
दहावी परीक्षांसह पीयुसी द्वितीय वर्षांच्या परीक्षादेखील लवकरच जाहीर करण्यात येणार असून या परीक्षांचे वेळापत्रक येत्या दोन दिवसांत जाहीर होईल, असेही सुरेशकुमार यांनी स्पष्ट केले आहे.









