बेंगळूर/प्रतिनिधी
अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर रविवारी तालिबानने ताबा मिळवल्यानंतर तेथील हजारो स्थानिकांनी देश सोडून जाण्याच्या अपेक्षेने विमानतळाकडे धाव घेतली आहे. अनेक नागरिक देश सोडून जात आहेत. दरम्यान,कर्नाटकचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांनी बुधवारी राज्यात शिकणाऱ्या अफगाण विद्यार्थ्यांना सर्व आवश्यक सहाय्य करण्याचे आणि त्यांच्या देशातील राजकीय घडामोडींनंतर त्यांच्या तक्रारी दूर करण्यासाठी पावले उचलण्याचे आश्वासन दिले.
कर्नाटकमध्ये शिकणाऱ्या अफगाणिस्तानमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या राष्ट्रातील संघर्षामुळे उद्भवलेल्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी राज्य सरकार सर्व मदत करेल, असे गृहमंत्री ज्ञानेंद्र यांनी बेंगळूर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
त्यांनी नमूद केले की, सध्या राज्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसह सुमारे ३०० अफगाण नागरिक आहेत. कर्नाटकात राहणाऱ्या अफगाण विद्यार्थ्यांच्या व्हिसा वाढवण्याबाबत राज्य सरकार केंद्र सरकारशी संवाद साधेल, असे मंत्री म्हणाले.
तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर, कर्नाटकात शिकणारे विद्यार्थी घरी परतले आणि त्यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षिततेच्या भीतीने ते हताश झाले.