वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
येथे सुरू असलेल्या कनिष्ठ आणि उपकनिष्ठांच्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत राणा प्रतापने झारखंडला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. या स्पर्धेत कर्नाटकाच्या मुलींनी दर्जदार कामगिरी करत आपली घोडदौड राखली आहे. कर्नाटकाने या स्पर्धेत आतापर्यंत 32 सुवर्ण, 28 रौप्य आणि 17 कास्य पदकासह सर्वंकष विजेतेपद राखण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. तामिळनाडू 7 सुवर्ण, 5 रौप्य, 10 कास्य पदकासह दुसऱ्या स्थानावर तर महाराष्ट्र 6 सुवर्ण, 15 रौप्य आणि 13 कास्य पदकासह तिसरे मिळविले आहे.
कर्नाटकाच्या हशिका रामचंद्रने 400 मी. वैयक्तिक मिडलेमध्ये नव्या स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक मिळविले. त्याचप्रमाणे महिलांच्या 100 मी. बटरफ्लॉय प्रकारात कर्नाटकाच्या तानिशी गुप्ताने नव्या स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक हस्तगत केले. या स्पर्धेत शनिवारी कर्नाटकाच्या इशान मेराने मुलींच्या आपल्या वयोगटात दोन सुवर्णपदके मिळविली. पंजाब आणि तेलंगणाच्या जलतरणपटूंनी प्रत्येकी एक सुवर्णपदक घेतले.









