बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकसह देशातील इतर राज्यांतही करोनाचं थैमान सुरूच आहे. करोना विषाणूच्या संसर्गाचा वेग प्रचंड वाढला असून, फेब्रुवारीपासून होत असलेल्या रुग्णवाढीने शुक्रवारी नवा उच्चांक नोंदवला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय, महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, तामिळनाडू, गुजरात आणि राजस्थान या दहा राज्यांमध्ये दररोज कोविड -१९ प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे म्हंटले आहे. भारतातील दैनंदिन प्रकरणे सतत वाढत असल्याचे मंत्रालयाने अधोरेखित केले. दिवसभरात दशेत एकूण १,३१,९६८ नवीन प्रकरणे नोंदविण्यात आली असून, देशात आतापर्यंतची सर्वाधिक वाढ नोंदविण्यात आली आहे.