बेंगळूर/प्रतिनिधी
युनायटेड किंगडम (यूके) येथून बेंगळूरला परत आलेल्या आणखी दोन प्रवाश्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवीन संसर्ग होत असल्याने देशात परतलेलय रुग्णांमध्ये हा संसर्ग सापडत आहे. यासह अशा नव्या संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ३१ वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, बुधवारी संध्याकाळपर्यंत युकेहून परत आलेल्या एकूण १९६५ प्रवाशांची आरटी-पीसीआर तपासणी झाली. यापैकी १६८६ प्रवासीनिगेटिव्ह आले आहेत, तर २४८ प्रवाश्यांचे अहवाल येणे बाकी आहेत.









