बेळगाव / प्रतिनिधी
विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी कर्नाटक राज्यावर मोठा अन्याय केल्याबद्दल भाजपला धारेवर धरले, ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकला पूरग्रस्त मदत देण्यासाठी भेट दिली होती. पण अजून मदत मिळाली नाही.
“हे डबल इंजिन सरकार नसून हा डबल-इंजिन सरकारचा धोका आहे राज्य आणि केंद्रात भाजप सत्तेत असल्यामुळे कर्नाटकला फायदा होईल अशी आश्वासने दिली गेली पण त्यातून काही मिळाले नाही.” असा त्यांनी खुलासा केला.
सिद्धरामय्या विधानसभेत पूरस्थितीवर बोलत होते. ते म्हणाले, 31 पैकी 23 जिल्हे पूरग्रस्त आहेत. ते म्हणाले, “आतापर्यंत, राज्यसरकारने केंद्राला चार मेमोरेंडम सादर केले आहेत – एक जुलैमध्ये, दुसरा जुलै-ऑगस्टमध्ये, तिसरा सुधारित जुलै-ऑगस्टमध्ये आणि चौथा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये,” असे सागून “वर्ष संपत आले आहे तरी केंद्राने तुम्हाला एक रुपया तरी दिला आहे का ?” असे त्यांनी राज्य सरकारला विचारले.









